सिनेमाला चला
सिनेमाला चला
झाला सुरू नोव्हेंबरचा महिना
सिनेमा बघायची हौस पुरी होईना
राया मला सिनेमाला घेऊन जाईना
गावात हाय टुरींग टाॅकीज भारी
घेऊन जाईल का सिनेमाला स्वारी
सहा महिन्यात एकदाही मला नेईना
राया मला सिनेमाला घेऊन जाईना
शाहरुख, सलमान आमिर खान
नाहीतर अमिताभचा दाखवा शान
कोणताबी सिनेमा मला दाखविना
राया मला सिनेमाला घेऊन जाईना
जयाचा जंजीर रेखाचा उमराव जान
गेलाबाजार भाऊ कदमचा नशीबवान
कोणत्याच पिक्चरला जाणं होईना
राया मला सिनेमाला घेऊन जाईना

