सिंधुताई सपकाळ
सिंधुताई सपकाळ
माय माझी सिंधुताई
साऱ्या जगाची माऊली
आधार निराधारांचा
जशी प्रेमाची सावली ||१||
सिंधू म्हणजे मायेचा सागर
कधीही न आटणारा
दिलीस आईची माया
दिला आधार न सुटणारा ||२||
बनली साऱ्या जगाची
प्रेमळ अशी सिंधुताई
अनाथांची आई बनली
प्रेमळ अशी सिंधुमाई ||३||
घडविले साऱ्या अनाथांना
प्रेमाची माया देऊनी
अशी कशी गेलीस ग माय तू
तुझ्या या लेकरांना सोडूनी ||४||