STORYMIRROR

Sarita Kaldhone

Inspirational

3  

Sarita Kaldhone

Inspirational

सिद्धीदात्री

सिद्धीदात्री

1 min
277

दुर्गारुप नववे तव

नाम असे सिद्धीदात्री

भक्तांची तू तारणहार

हीच एकमेव खात्री....


करता तुझी उपासना

प्राप्ती सर्व सिद्धीची 

फडकेल नित्य पताका 

ब्रम्हांडावर विजयाची...


भगवान शिवा लाभली कृपा

वरदानाने बनले अर्धनारी नटेश्वर

सर्व सिद्धींचे आगार तू

तूच साक्षात परम ईश्वर....


रूप तुझे चारभुजाधारी

आई सिंह असे वाहन 

हाती असे कमळ फुल

होऊ शकते कमळावरही विराजमान....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational