STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Romance

4  

Meenakshi Kilawat

Romance

श्वासातला सुगंध होऊनी"

श्वासातला सुगंध होऊनी"

1 min
486

श्वासातला सुगंध होऊनी 

प्रतीच्या मस्त उबेत डुंबायचे 

वेडे होवूनी या रानोमाळी 

चिंब होवूनी हिंडायचे..


नकळत हृदयात दोघांनी 

एकत्रच हसूनीया शिरायचे 

हृदयात पक्के स्थान मांडूनी

असे धूंद होवूनी जगायचे..


स्वप्नात वेदनाचा हा उतारा

डोळ्यात साथीने उतरायचे

पाझरणाऱ्या या अश्रूंमध्ये

सप्तरंगी इंद्रधनू सजवायचे..


केसांमधूनी पाठीवरूनी 

मंद झोताने ओघळायचे

रोमछिद्रे ही अंगावरची

थेंब थेंब अलगद साठवायचे..


वाऱ्याला श्वासात कवटाळूनी 

शिखरावरती उंच भरारी घ्यायची 

कुशीत ढंगाच्या शिरकाव करूनी

दामिनीसमं चमकूनिया तळपायचे.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance