श्रावण
श्रावण


श्रावण रिमझिमतोय
तनात
आणि मनामनात
श्रावण धुंद फुंद
नवोदितेच्या प्रणयासारखा
श्रावण मधाळ
षोडशेच्या हास्यासारखा
श्रावण ओढाळ
यक्ष गानातल्या विरहिणी सारखा
श्रावण खट्याळ
पाळण्यातल्या तान्हल्यासारखा
श्रावण चंदेरी श्रावण सोनेरी
श्रावणाची महती
श्रावणात जाणे
त्याचे रिमझिमणे
त्याचे बरसणे
जणू शृंगारलेल्या तरुणीच्या
अंगावर अत्तराचा शिडकावा
श्रावण बहरावा असाच
तनात मनात जीवनात