शोधू नको बहाणे
शोधू नको बहाणे
झाले मी शहाणी
समजू नको मज खुळी
अन् स्वतःला शहाणा
रीत तुझी झाली जुनी
नको दावु उगा बहाणा
आज येतो म्हणूनी सदा
किती लावी मनी आशा
दिवस जातो सरूनी
माझ्या पदरी निराशा
पुरे झाले तुझे बहाणे
अंत नसे तया कधीच
नाही मज वेळ आता
सांग केव्हा येणार खचित
तव आशेवर जगता
पहात बसते वाट
रोजच रोज नवाच
तुझ्या बहाण्याचा थाट

