शोध आईचा
शोध आईचा
अशीच एक संध्याकाळ
सोबत मी आणि माझं त्रिकोणी कुटुंब
कॉफी आणि डॉनिट्सच्या जुगलबंदीत
मनसोक्त रंगलेलं
परका देश परकी माणसं
सगळंच नावीन्यानं भरलेलं
नजर मात्र काहीतरी
शोधत होती
आई चं काळीज ते
समोरच्या खुर्चीतल्या छोट्याश्या गोंडस बाळा ला
ही दोन गडी माणसं का बरं घेऊन आली असतील
अन बाळाची आई कुठाय?
अनेक विचार आणि कल्पना करून संपल्या
एकजण मेनूकार्ड मध्ये पूर्णपणे हरवला होता तर
दुसरा मात्र काही ना काही बाळाला देत खेळवत होता
खेळणं हातातून पडलं अन बाळाने तार सप्तक पकडलं
आता मात्र माझ्यातली आई मला बसून देईना
का बरं एवढा वेळ पोर आई बिना वैगेरे बरंच ठणकावून विचारवं वाटू लागलं
इतक्यात बाळानं हात पुढे केले
त्यानं बाळाला घट्ट मिठी मारली
बाळ अगदी शांत झालं
मग दोघांची नजरानजर झाली
अन एका आईला दुसऱ्या आईची खूण पटली
आज पर्यंत बऱ्याच आई पाहिल्या होत्या
पण ही पान्हा नसून मायेनं पान्हावलेली
आई मला प्रसन्न करून गेली
