STORYMIRROR

Vidya Anand

Romance

3  

Vidya Anand

Romance

मला कळलेली राधा

मला कळलेली राधा

1 min
116

चाफा फुलाला होता 

रोज सारखाच दरवळत होता

सगळं काही नेहमीचं होतं

वाट पाहणारी मी आणि उशिरा येणार तू


पण आज मात्र तू आला नव्हतास 

तुझ्या भेटीसाठी आतुरलेले मन 

आता मात्र काळजीच्या काळोखात जाऊ लागला होतं 

सुंदर चाफा जणू मला भीती दाखवत होता

एकटेपणाची रोजची हविहवीशी वाटणारी शांतता आता मात्र सहावेना 

इतक्यात आठवला ..काल तू विचारलं होतस


राधा व्हायला आवडेल तुला ?


मी ही अगदीच क्षणात उत्तर दिलं 

तू कृष्ण होऊन येणार असशील तर मात्र नक्कीच

पूण मी हे का आठवते आहे?

आजचं तुझं न येणं म्हणून ?

रोज पाण्यात पाय सोडून तुझी वाट पहाणारी मी 

स्वतःच्याच प्रतिबिंबाकडे पाहून हसणारी 

पण आज सगळं वेगळं होतं


खरंच राधा व्हायला आवडेल मला?


पूण हे कसा शक्य आहे?

व्यवहाराच्या या जगात हे काय राधा कृष्ण घेऊन बसले मी ..

इतकं का व्याकुळ व्हायचं 

होतो उशीर कधी कधी

वाट पाहणं तर मलाही ठाऊक आहे म

आजच असं का?


विचारांच्या या वादळात सहजच पाण्यात पाहिलं

पाहिलं तर काय माझा प्रतिबिबच दिसे ना

आता मात्र काही उमगेना पुन्हा पुन्हा प्रतिबिंब शोधताना 

दिसला ते फक्त आकाश

निळं भोर अखंड आकाश 

अन आकाशभर पसरलेला तू

तुला असं आकाशभर पसरलेलं पाहून 

वाटलं कशी येऊ तुझ्यापर्यन्त 


तुला असं आकाशभर पसरलेलं पाहून

वाटलं आपण ही एक चांदणी व्हावं

आकाशभर पसरलेल्या तुला 

पांघरून घ्यावं 

चांदणी होऊन का होईना 

पण वेचत राहावा तुला 

कणाकणातून क्षणक्षणातून 

कदाचित राधा म्हणून तुलाही हेच अभिप्रेत असावं

या साऱ्या विचारांत कधी तू मागे येऊन उभा होतास कळलंच नाही


पण हो तुझी राधा मात्र मला कळली होती...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance