STORYMIRROR

Shobha Sanjay Bavdhankar

Classics

3  

Shobha Sanjay Bavdhankar

Classics

शिवमहिमा

शिवमहिमा

1 min
284

अभिमान आहे शिवरात्रीच्या महान पर्वाचे

सांब शिव दैवत आवडते सगळ्यांचे 

सृष्टीचा तो तारणहार गोरस अभिषेक आवडतो फार 

श्रीफळ, बेलफळ, धोत्रा शिवाला वाहू देवाने केला बेलफुलांचा वर्षाव राजीवनेत्राने पाहू 

पार्वतीबरोबर रंगतो सारीपाट जीवनसंघर्ष लढण्यासाठी दाखवितो वाट 

नीलकंठ नाव, केले त्याने विषप्राशन हिमालय बर्फावर त्याचे आसन 

क्रोधीत होता करता तांडव शिवरात्रीचे महान पर्व, सजवला मंदिरात मांडव 

हर हर महादेव करू जयघोष जीवनात खरा आनंद देणारा तो आशुतोष 

संकटकाळात उघडतो तिसरा डोळा

सर्व विश्वाला वंदनीय आहे शिव भोळा ॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics