शिवबा राजे 🚩
शिवबा राजे 🚩
धन्य धन्य शिवराय
स्वराज्याचे पालनहार
शुर वीर पराक्रमी
मराठमोळा सरदार
सह्याद्रीच्या कुशीत
रांगडले बागडले
शिवनेरीच्या मातीत
रत्न शुर वीर जन्मले
ज्ञानवंत शीलवंत
शिव छत्रपती महान
प्रजावंत न्यायवंत
स्त्रीशक्तीचा करे सन्मान
स्वराज्याचे रक्षक
छत्रपती शिवराय
रक्षण करण्या प्रजेचे
अवतरले शिवराय
तटबंदी आरमार
दूरदृष्टीने उभारले
गडकिल्ले पर्वत
तटस्थ ते बांधले
हिंदवी स्वराज्याचे
स्वप्न त्यांनी साकरले
सवंगडी मावळ्यांसह
गडकिल्ले हो जिंकले
धन्य धन्य माय माता
धन्य आहे जिजाऊ
ऐसा रत्न पोटि जन्मले
किती त्यांची किर्ती गाऊ
