शेतकरी राजा
शेतकरी राजा
शेतकऱ्याच्या आयुष्याचा मांडलाय खेळ
त्याच्यासाठी नाही कोणालाही वेळ
राबतोय शेतात तो दिवसभर
म्हणून जेवतो आपण पोटभर
काळ्या आईची केली सेवा त्यानं आयुष्यभर
पण त्याच्या पिकालाही मिळत नाही दर
शेती करण्यास लागते तेव्हढी हिंमत
त्याच्या कष्टांना कधी मिळेल खरी किंमत?
चांगली झाली शेती तर येणारा पैसा साऱ्यांना दिसतो
पण त्यामागचे कष्ट अन् मेहनत सारे कसे विसरतो?
बहरलेलं शेतं त्याचं साऱ्यांना दिसतं
नुकसान होतं तेव्हा साऱ्यांचं लक्ष कुठे हो असतं?
काय सांगावं जीवाचं मोल किती त्याच्या
साऱ्या जगाचा पोशिंदा तो शेतकरी राजा
