Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Vitthal Chobe

Inspirational

3  

Vitthal Chobe

Inspirational

शेर शंभुराजा

शेर शंभुराजा

1 min
172


शिवशंभूच्या रक्ताने पावन झाल्या, 

सह्याद्रीच्या शिळा,

या मराठमोळ्या मातीचा लावा, 

कपाळी आपल्या टिळा l 


रायगड पुरंदर गाती, तव पराक्रमाची गाथा, 

तुमच्या शौर्यापुढे सह्याद्री झुकवी आपला माथा l


तुमच्या स्वाभिमानी तेजापुढे 

फिके पडती सूर्य, चंद्र, तारे, 

पाहुनी पहाडी छाती तुमची 

मागे फिरती तुफानी वारे l


तुमचे पोलादी मनगटाचे कणखर हात, 

नमले कधी न मस्तक, केलीस मृत्यूवर मात l 


समोर मृत्यू उभा पर मागितले नाही जीवनदान, 

शत्रुपुढे कधीही न झुकली सदैव तुमची ताठ मान l


कटकारस्थान शिजले शिर्क्यांच्या गोठात, 

शेर शंभू बंदी झाला मुघली साखळदंडात l


लचके तोडण्यास सज्ज होत्या मोगलांच्या फौजा 

पर खचला नाही सिंहाचा छावा, शेर शंभुराजा l


सिंहाची चाल, तुमची वाघाची नजर, 

मुखी निनादे सदा जय भवानीचा गजर l 


पाहुनी मुख मंडली, तेज महाप्रतापी अखंड, 

थरथरे दिल्लीचे तख्त, औरंगजेबही झाला थंड l


नराधमाने छाटली तुमच्या वज्रदेहाची कातडी, 

सुरे खूपसून पोटी रक्तबंबाळ केली आतडी l 


जखमी शरीरावर चोळले तिखट मिठाचे पाणी, 

जीभ छाटूनी बंद केली सिंहगर्जनेची वाणी l


हातापायाचे तुकडे करुनी अंती केला शिरच्छेद, 

वेदनेने भीमा अश्रु ढाळी, मुके झाले चारी वेद l 


किती सोसल्या यातना इथे मृत्यू ओशाळला, 

एक तेजस्वी सूर्य देश धर्मासाठी वधस्तंभी मावळला l


Rate this content
Log in