Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vitthal Chobe

Others

4  

Vitthal Chobe

Others

IIआई ll

IIआई ll

1 min
246


आई म्हणजे पंढरीचा उंच कळस

आई म्हणजे वृंदावनातील कृष्ण तुळस l


 आई म्हणजे जनाबाईची मंजुळ वाणी

 आई म्हणजे चंद्रभागेतील शितल पाणी l


 आई म्हणजे प्रेमाचा खळखळणारा झरा

 आई म्हणजे मायेच्या फणसातील गोड-गोड गरा l


 आई म्हणजे प्रेमाचा सागर

आई म्हणजे सर्व गुणांचे आगर l


 आई घालिते दुःखांवर प्रेमाची फुंकर

आई घालीते लेकरांवर मायेची पाखर l


 आई मुलाचं असतं नाजूक नाजूक नातं

जशी देव्हार्‍यात तेवणारी मंद-मंद ज्योत l


 आई असते सर्व कुटुंबाची शान 

 म्हणून आई असते ईश्वरा पेक्षा महान l


 हृदयात साठवलेली सर्व सुख-दुःखे आईलाच सांगा

 आई असते काशीची पवित्र गंगा l


 आठवण येता तिची उमाळा उरी दाटतो

 साठलेल्या आसवांचा बांध अचानक फुटतो l


 अहो कशाला जाता काशी-रामेश्वर

 आईच्या चरणी सर्व तिर्थाचा सागर l


Rate this content
Log in