Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vitthal Chobe

Abstract

3  

Vitthal Chobe

Abstract

वनीकरणाची नवी पहाट

वनीकरणाची नवी पहाट

1 min
175


हिरवा परिसर जीवन नवे

एक तरी झाड लावून जपायला हवे l


दृष्ट मानवा तूच तोडली हिरवीगार झाडी

धरती मातेची फाडली भरजरी साडी l


अविचाराने केलास तू वनराईचा विनाश

सर्वांच्या गळ्याला दुष्काळाचा फास l


आली दुष्काळाची त्सुनामी लाट 

कंबर कसूनी धरा वनीकरणाची वाट l


होता वनीकरण बरसतील पाऊस धारा 

मिळेल जनावरांना चारा अन् पक्षांना निवारा l


होता वनीकरण भरतील तळी पिकतील मळी

तुटेल दुष्काळाची जाळी भरतील धान्यांन खळी l


वृक्ष आपले सगेसोयरे मित्र जीवाभावाचे

रक्षण करती वन्य जीवितांचे l


पाणी घालुनी करा वृक्ष वेलींची सेवा

मिळेल शुद्ध हवा अन फळांचा रानमेवा l


विद्यार्थ्यांनो झाडे लावा झाडे जगवा

शेतकऱ्यांनो झाडे लावा झाडे जगवा

होऊद्या सगळीकडे वनीकरणाची हवा l


वनीकरणाची होत आहे नवी पहाट

पहावी लागणार नाही आता पावसाची वाट l


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract