शब्दफुलांची चादर....
शब्दफुलांची चादर....
दोघांमधील नातं आपलं,
म्हणजे हिरव्या पानावरील दवं...
भले स्पर्श नसतो एकमेकांचा,
जसे दूरचे आपले निस्सीम लव......
तू कुठे अन मी कुठे,
तरीही जुळले नाते...
माझ्या मनात बरसलेली सर,
हळूच तुझ्या ही अंगणात जाते...
वारा ही कधी कधी कानात,
येऊन मला बोलतो....
त्याने आणलेला सुगंध,
हृदयात माझ्या फुलतो...
अट नसलेल्या तुझ्या प्रेमाची,
खरंच करतो मी कदर....
म्हणूनच निजताना तुला पांघरतो,
माझ्या शब्दफुलांची चादर....

