शाळा
शाळा
शाळेच्या या प्रांगणी
नंदनवन फुलले
आनंदाच्या स्वरलहरींवर
गीत मनीचे खुलले
सरस्वतीच्या चरणावरती
नतमस्तक झाले सारे
एकमेकांच्या सोबती
आक्रमती यश शिखरे
खेळ खेळूनी मजेमजेचे
सदृढ शरीरा करती
सदृढ या शरीरी
सदृढ मने वसती
शब्दा शब्दातून रुजते
येथे मोती संस्कारांचे
इथे वाहती नित्यनेहमी
झरे आनंदाचे
आईची माया मिळते
मिळतो पित्याचा धाक
मित्र प्रेमाचा ठेवा रुजतो
शाळेच्या या प्रांगणात
