भावरूप
भावरूप
1 min
198
सगळे विचारतात मला
कसं काय जमतं तुला
एवढ्या धावपळीत
कसं काय सुचतं तुला
काय सांगू तुम्हाला
कविता कशी बोलते
अव्यक्त माझ्या मनाला
हळूहळू खुलविते
मनाचा प्राजक्त
शब्दच सांडतो
शब्द फुले वेचता वेचता
भावनांना जागवतो
त्या माझ्या भाव फुलांचं
होतं देखणं रूप
कविता म्हणतात त्याला तुम्ही
जिथे मी होते भावनांशी एकरूप
