शब्द
शब्द
1 min
73
एखादा शब्द असा
तर एखादा शब्द तसा
एखादा अर्थानुगामी
तर एखादा पोरका
एखादा अगदी थेट
उतरतो काळजावर
तर एखादा करतो
वार जखमांवर
एखादा अनाकलनीय गूढ
तर एखादा सहज उतरणारा
एखादा चमत्कारिक
तर एखादा मिश्किल हसविणारा
एखादा शब्द जोडतो
दोन मनांना
तर एखादा शब्द
वेगळे करतो विचारांना
एखादा शब्द असा
एखादा शब्द तसा
शब्द असो जसा,कसा
दाखवितो मनाचा आरसा
