सांजवेळ
सांजवेळ
1 min
310
सांजवता कातरवेळी
हे मन पाखरू भिरभिरते
मग हुरहुरत्या या क्षणी
आठवणींनी थरथरते
तू दिसावे मज पहावे
ही आस लागतेच अशी
उगवतीच्या त्या दिशेला
चंद्र लावतो ओढ मनी
त्या तिथे अंगणात किती
फुलली सख्या रातराणी
मोहरलेल्या गंधाने
कातरवेळ धुंद झाली
या तनामनावर शिंपे
चंद्र अत्तर चांदण्याचे
शोधी किती बहाणे मन
तव मिठीतच जागण्याचे
दाटूनी आला तम बघ
थकल्या या आठवणीही
परतून ये असा जवळी
ओढ जाण ही अंतरीची
