STORYMIRROR

Pandharish Cheke

Inspirational

4  

Pandharish Cheke

Inspirational

शाळा

शाळा

1 min
549


# शाळा #


विकल मनाच्या पडवीमध्ये

घणघण घंटा भरते शाळा

वर्ग तासिका हस्तपुस्तिका

थकवी मास्तर खडू फळा...


उंचाविती हात षडरिपू

त्यांना अवगत प्रश्न गहन

मागील बाकावर पेंगुळते

रोज भाबडे द्रष्टे मन...


रसाळ मोठे विषय विभ्रमी

गृहपाठाची कसरत पुरती आखीव रेखीव अक्षर ओळी

डाग शाईचे आत्म्यावरती...


घोकून पाढे प्रश्न उत्तरे

का टक्क्यांचा चुकतो होरा

वाचाळाना वेळ पुरेना अन मौनाचा पेपर कोरा..!


இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை

Similar marathi poem from Inspirational