STORYMIRROR

Pandharish Cheke

Inspirational

3  

Pandharish Cheke

Inspirational

परत फिरू दे

परत फिरू दे

1 min
681


# परत फिरू दे #


तूच ठरवली समरभूमी

अन पलटण तुझीच सैन्य,

लढाई शस्त्रसज्ज मी कधीच नव्हतो

व्यूह तुझे अन तुझी चढाई ..


पुरुषार्थाची न च अभिलाषा

रथ, अंबारी तूच वळवतो

नीती-अनीती बोट मधाचे

रोज दमवतो...रोज पळवतो...


आसक्तीचा कोंब लकाके

कुणी ठेविला देही रुजवून

काय तुझा तो उदात्त हेतू

मी शब्दातून येतो उगवून...


कौतुक कसले ओझे झाले

नकोत अक्षर कवचकुंडले

परत फिरू दे आज; माधवा-

व्यर्थ जिण्याची सहस्त्र शकले.!

***


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational