सेल्फी
सेल्फी
आजकालच्या तरूणाईला
सेल्फी काढण्याचा लागलाय नाद,
फेसबुक आणि ट्विटर त्यांना
वेळोवेळी घालतात साद
तरूणाईचा जोश वाहतो
यांच्या नसानसांमध्ये,
चुकीची कृती उद्ध्वस्त करते
आयुष्य त्यांचे क्षणामध्ये
धोकादायक कठड्यांवरती
ऊंच अशा त्या टोकांवरती,
खतरनाक ती सेल्फी काढण्या
स्वतःशीच ते थट्टा करती
अचानक मग पाय घसरतो
सेल्फीला त्या अर्थ न उरतो,
धाय मोकळून रडणार्या त्या
मात्यापित्यांचा आत्मा झुरतो
फसव्या अशा ह्या सेल्फीपासून
तरूणाईने दूर राहावे,
प्रफुल्लित असे स्वतःचेच ते
प्रतिबिंब आरशात पहावे...
