सौजन्य...
सौजन्य...
सौजन्य म्हणजे दुसऱ्याची, कदर करून वागणं,
सौजन्यशील होतात मोठी,वाढवतात तुमचं मोठेपण
नैतिक वर्तन हेच असते, सौजन्याचं प्रकट रूप,
सौजन्य म्हणजे नम्रता,सभ्यतेचे असते प्रारूप
आपल्या कृती व वर्तनातून,सौजन्य सहजपणे व्यक्त होते,
ही असते छोटी गुंतवणूक, त्याचे प्रचंड फायदे असते
सौजन्य निर्माण करतं,इतरांच्या भावना जपण्याची वृत्ती,
सौजन्यातून प्रकट होतात संस्कार,दिसते संवेदनशील प्रवृत्ती
