STORYMIRROR

VINAYAK PATIL

Tragedy

4  

VINAYAK PATIL

Tragedy

सावली

सावली

1 min
180

एकटाच उभा स्तब्ध मी

कोणीही फिरकला नाही 

सावलीला ही माझ्या 

सावली सुद्धा उरली नाही 


ओसाड या जगात

खेळ संपला भावनांचा 

आधार मज वाटे

माझ्या सावलीचा 


सावलीने शिकविले मज 

कसे एकटे जीवन जगावे 

अंधाराच्या वाटेवर चालताना 

कोणीही सोबत नसावे 


ऊन सावलीचा खेळ

मज आवडतो खरा

दोघेही क्षणाचे सोबती 

उसंत वाटते मना जरा 


सुन्न झाले मन 

ओसाड पडली जागा 

एकटाच राहिलो मी 

माझी सावली हाच धागा 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy