STORYMIRROR

Archana Murugkar

Inspirational

3  

Archana Murugkar

Inspirational

अपेक्षा आजच्या सावित्रीच्या

अपेक्षा आजच्या सावित्रीच्या

1 min
218

शेणगोटे समाजाचे

साही सारे धेय्यासाठी

शिक्षणाला योग्य साथ

ज्योतीबांना सावित्रीची


जन्म तुझा गौरवाचा

आम्हा तुझ्या लेकींसाठी

शिक्षणाचा दिला वसा

सुधारणा साऱ्यांसाठी


बांधू नका स्त्रीला आज

वृथा रूढी बंधनात

अर्थ जीवना व्यापक

स्वप्ने आणूया सत्यात


खरा हक्क स्त्रीचा तिला

देऊ समाज घरात

नको सीमा शिक्षणाला

समानता निर्णयात


जरी शिक्षण मिळते

मिळो सारे मान तिला

नको निर्भया समाजी

जगू द्यावे बालिकेला. 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational