साऊमाई
साऊमाई
शब्दपालवी सखी मंच आणि स्टोरी मिरर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उपक्रम काव्य लेखन स्पर्धा
दिनांक - १५/०२/२०२२
विषय - क्रांतिकारक
पति जोतिबांच्या साथीनं
पेटवली तू मशाल
तुझ्या ज्ञानज्योतीचे भांडार
आज किती झाले आहे विशाल
हवी आहे पुन्हा एकदा साऊमाई आम्हांला
तू लावलेलं ज्ञान रोपटे पहाण्याला
गुलामगिरीच्या बंधनातून मुक्त केलेस नारीला
तुझ्यामुळेच अर्थ आला स्त्री जातीच्या जगण्याला
अशी तू विरंगना क्रांतिज्योती
पतीकडून शिक्षण शिकली
मुलींची पहिली शाळा सुरू केली
अवघ्या विश्वाची ज्ञानाचा ठरली
शेण, चिखल, माती अंगावर झेलले
पण स्त्री जातीचे ज्ञान द्वार खुले केले
पतीपत्नीने आपले सर्वस्व पणाला लावले
माणूसकीचे ज्ञानदानाचे झरे अखंडतेने निरंतरले
साऊमाई आम्ही तुझ्याचगं लेकी
ज्ञान संस्कार शिदोरी डोहिवर घेवून
सदैव ज्ञान ज्योत चालवणार
हेच तुला नमन, नित्य तुझे स्मरण
