STORYMIRROR

Sarika Jinturkar

Romance

3  

Sarika Jinturkar

Romance

साथ तुझी असतांना..

साथ तुझी असतांना..

1 min
136

साथ तुझी असतांना 

भीती नसते रे मला कशाची  

सोबत असावा सदैव 

असाच तू

खडतर वाट 

चालतांना आयुष्याची  


मनकवडा, शालीन तू असा 

कसा प्रत्येक गोष्ट जाणतो मनातली

निःशंक होते मन 

घट्ट होते विण नात्याची 

मिठी तुझी मला भासते

 प्रेमाची अन् अतूट विश्वासाची  


सहवासात तुझ्या झाले 

आयुष्य नभात फुललेली चांदणी 

 सोबत तुझी असतांना 

जीवनात अविरत 

बरसात होई सुखाची

राहू असेच आजन्म बनून एकमेकांची सावली 

दे अशीच साथ जीवनाच्या प्रत्येक पावलोपावली 

इच्छित सारे मिळून तुला

 निरोगी आयुष्य लाभावे  

एवढीच इच्छा मनी 

तुझ्या प्रत्येक सुख दुःखात

माझे स्थान नेहमी असावे 

अव्यक्त भावना मनीच्या व्यक्त झाल्या

ह्या क्षणी फुलला प्रीतीचा वेल अंगणी

तुझ्यासोबत झाले मी समृद्ध या जीवनी .



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance