साथ प्रेमाची
साथ प्रेमाची
प्रेम हे प्रेमच आहे
जे ईश्वराचच दान,
मनातील भावनेला
कल्पकतेची तहान.
मनातील भावनाच
मनाला करते स्पर्श
आत्म्यालाही का कळेना
दोन मनांचा हा हर्ष.
रोमारोमात भिजला
पानाफुलातला गंध,
जाई जुईच्या जोडीने
दरवळला सुगंध.
जीव लावून प्रिये
चित्त बावरून गेले,
तुझ्या आठवणी संग
मन मोहरून आले .
कस होऊ उतराई
प्रेमाला उपमा नाही,
देणाऱ्याने देत जावे
प्रेमातच सारे काही.