STORYMIRROR

Pandit Warade

Classics Others

3  

Pandit Warade

Classics Others

सांजवात

सांजवात

1 min
364

रवी मावळता आली

गुरे वासरे गोठ्यात

मुले, माणसं, पाखरे

आपापल्या घरट्यात


आजी आजोबा घरात

दिवा तुपाचा लावती

देवापुढे   सांजवात

धूप  नैवेद्य  आरती


सांजवात तेजाळता

निघे  उजाळून  घर

मुला बाळांसाठी होई

नित्य संस्कार जागर


देवापुढे  सांजवात

घर  सारे  उजळते

सकलांच्या चित्तामध्ये

स्फूर्ती, प्रसन्नता येते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics