STORYMIRROR

sagar Khopkar

Classics

4  

sagar Khopkar

Classics

सांज

सांज

1 min
572

काहूर मनी त्या सांजवेळी

गडद नभात कशी ओझरली

नटूनी चिडवितो रवी असा

लाली गालावर तांबडी पाझरली


खुणविते का सागराची लाट

जाते हळूच देऊन पुकार

रेती सोबत तिच्या माघारी

निसटते अलगद सांगूनी नकार


राहिली नेमकी आठवण तुझी

परतली कशी पुन्हा काळरात 

भेटीसाठी मग चंद्राला साकडे

ग्रहण सांगत विझली चांदरात


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics