विधिलिखित
विधिलिखित
1 min
91
पाहता प्रजेचे दुःख
आकाशातून दिला संदेश
मृत्यू तुझा विधिलिखित
दुष्ट कंसास हा उपदेश
देवकीचा आठवा पुत्र
मामास देईल मात
ठरेल मृत्यूचे कारण
करेल कंसाचा घात
राजा मथुरेचा कंस
कोंडतो काळकोठडीत धरून
देवकी वसुदेवाचे सात पुत्र
जन्मतःच टाकिले मारून
अष्टमीच्या रात्री जन्मतो
कृष्ण आठवा देवकी पोटी
यमुना ओलांडून पुत्रासह
वसुदेव नंदराय भावा भेटी
यशोदा नंदरायाची ती लेक
वसुदेव मथुरेस घेऊन गेला
श्रीकृष्ण गोकुळात वाढून
वध कंसाचा देवकी पुत्रानेच केला
