STORYMIRROR

sagar Khopkar

Inspirational

3  

sagar Khopkar

Inspirational

पुण्य

पुण्य

1 min
260

एकच पुण्य केलस तु

अंधत्व मला दिलस तु

सृष्टी सुंदर घडवूनी

दृष्टीचीच नजर लावलीस तु


एकच पुण्य केलस तु


कधी हात कुठला देवुन हाती

साथ तुझी दिलीस तु

तर ठेच कधी लावून

पुन्हा जाणीव करून दिलीस तु


एकच पुण्य केलस तु


आंधळ्या दुनियेत सोडून

थाप विश्वासाची दिलीस तु

तर काठीचा बनून आधार

स्वावलंबी मला केलस तु


एकच पुण्य केलस तु

अंधत्व मला दिलस तु़


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational