सांग ना
सांग ना
तू येण्याची कारणे किती सांग ना
मनात तुझ्या कोणती भीती सांग ना
पाहतो तुला फुलांच्या पाकळ्यात रोज
सुगंधात तुला विसरण्याची रीती सांग ना
वाहतेस पाटातून तू अश्रूंच्या रानात
विरोध केलास का ही कोणती नीती सांग ना
प्रेमात वाहणारे वारे पलटून गेले आज
सोडून हात जातेस ही कोणती मिती सांग ना
काळीज जाळून गेलीस आज माझं तू
अन वेडा समजलीस ही राजनीती सांग ना
तुझ्यामुळे जिंदगी नरक झाली माझी ही
अन आता कशी बदलेल स्थिती सांग ना
गरीब समजून सोडून गेलीस अशी तू का
माझ्या श्रीमंतीची कधी केलीस स्तुती सांग ना