साजणी
साजणी
धुंद रात वादळात पावसात साजणी
दंग आज प्रेम रंग खेळण्यात साजणी
आसपास शांततेत प्रेम रंग गंधला
थंडगार गारव्यात गीत गात साजणी
सांगतो मनातले तुला गुपीत कामिनी
घे मिठीत खास रेशमी करात साजणी
आज घे भिजून छान चांदण्या मधे सखी
प्रेम आग पेटली इथे मनात साजणी
आवळून प्रेम पाश घट्ट आज घे तुझे
चंद्र साक्ष लाभली पहा नभात साजणी

