साधुबोध झाला तो
साधुबोध झाला तो
साधुबोध झाला तो नुरोनियां ठेला । ठायींच मुराला अनुभवें ॥१॥
कापुराची वाती उजळली ज्योति । ठायींच समाप्ति झाली जैसा ॥२॥
मोक्षरेख आला भाग्यें विनटला । साधूंचा अंकिला हरिभक्त ॥३॥
ज्ञानदेवा गोडी संगति सज्जनीं । हरि दिसे जनीं आत्मतत्वीं ॥४॥
