STORYMIRROR

Ashok Shivram Veer

Romance

2  

Ashok Shivram Veer

Romance

रुप तिचे...

रुप तिचे...

1 min
38

अशी ही नाकी डोळी छान,

रंग हिचा गोरा गोरा पान,

त्यात आलं तरुणपण सतवायला,

कसं नेहु मी हिला फिरवायला.


करू कसा मी आनंद साजरा,

रोखून बघतात साऱ्यांच्या नजरा,

गाण्याच्या तालावर ही झुलाया लागते,

बॉडीगार्ड होऊन मागे पुढे फिराया लागते.


कुरळ्या केसांच्या कशी उडवती बटा,

दिसेल त्याला ही अशी करते टाटा,

पागल होती सारी पाहून हिच्या अदा,

अन ही साऱ्यांनाच म्हणते काय रे दादा.


चेहरा असतो मानेत नेहमीच वाकडा,

पापण्यांच्या वरती भुवईचा आकडा,

ओठावर लाली कपाळी टिकली,

हिच्यावर सारीच मरू कशी लागली.


अशी ही नाकी डोळी छान,

रंग हिचा गोरा गोरा पान,

त्यात आलं तरुणपण सतवायला,

कसं नेहु मी हिला फिरवायला.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance