ऋतु हर्षाचा आला
ऋतु हर्षाचा आला
ऋतु हर्षाचा आला
झाली पानगळ अन्
पुन्हा फुटली पालवी
वसंताचं हे सौंदर्य
मन सर्वांच भुलवी
रंग सुंदर फुलांचे
मनोहर आकर्षक
पसरले दुरवर
गालीचेही ते मोहक
गंध घेऊनी फुलांचा
धन्य होतयं जीवन
गुंजारव भ्रमरांचा
कानांमध्ये ते कुजन
पाखरांना पाहताच
वेडा जीव नादावला
सांगू काय सकलांना..??
ऋतु हर्षाचा हा आला
