ऋणानुबंध
ऋणानुबंध
हा तुझा सुगंध
तनामनात,भिनला
रोमरोमात ऋणानुबंध
भरला सर्वांग
श्वासाश्वासात रोमांच
निखरले आज सांगोपांग
स्पर्श निकटचा
सख्या रूतुन बसला
आभास गं कस्तुरीगंधाचा
घेतले कवेत
साजणा, कानी वदला
राणी, आयुष्य तुझ्यासवेत...
हदयी जपला
बनला श्वास दुसरा
ऋणानुबंध असा घडला

