रंगभूमी
रंगभूमी
तू रंग लाव चेहऱ्याला...
आणि उभा राहा रंगमंचावर..
प्रेक्षकांच्या नजरेत स्वतःला..
बंदिस्त करून घे...
साठवून घे कानात...
टाळ्यांचा तो कडकडाट...
गर्दीत असतोस तेव्हा...
कुणीच पाहत नसतं तुला...
झेलून घे आता त्या असंख्य नजरा...
ज्या रोखल्या गेल्यात फक्त तुझ्यावर ता
तूच हसवणारा आणि तूच रडवणारा..
तुझे संवाद त्यांच्या काळजाला भिडवणारा.. प्रकाशाच्या रंगात रंगून जाणारा..
नवरसांची चव चाखणारा...
तू कोण हे विसरून...
नव्याने जन्मणारा...
क्षणाक्षणाला बदलणारे भाव...
हृदयाचा ठाव घेऊ पाहणारा...
कलाकार तू फक्त...
रंगभूमीसाठी जगणारा...
आई रंगभूमी सांभाळ गं तुझ्या या लेकराला
