गरज वाटत नाही
गरज वाटत नाही
आयुष्य माझं आहे त्याला जगायचं मला आहे येणाऱ्या प्रत्येक संकटांना तोंडही मलाच द्यायच आहे
चुकल्या वाटा तरी मार्ग मलाच शोधायचा आहे एकटं का होईना त्यावर् चालत मात्र रहायचं आहे
कधी येईल अपयश तरी लढत रहायचं आहे स्वतःच स्वतःला सावरत पुढे जायचं आहे
सगळंच मी करायचं आहे तर लोक काय म्हणतील यासारख्या विषयाचा विचार करत राहणं याची मला मुळीच गरज वाटत नाही...
