रंग तुझ्या प्रेमाचा
रंग तुझ्या प्रेमाचा
रंग तुझ्या प्रेमाचा चढला
चेहऱ्यावर गुलाबी लाली
निरागस हास्य मुखावर
गालावर पडे गोड खळी...१!
तुझे प्रेम ओथंबून वाहे
अंग भिजून चिंब झाले
क्षणाक्षणाला मोहरून
आनंदून मन माझे गेले...२!
किती वेगवेगळे रंग भरले
जीवनाला आली रंगसंगती
सुगंधी फुलांचा वर्षाव होता
रोम रोम पुलकित होती...३!
माझ्या जीवनाचा चित्रकार
सदैव आधार रे हाताचा
सुखाच्या या हिंदोळ्यावर
जीवनात रंग तुझ्या प्रेमाचा...४!

