रंग तुझ्या माझ्या प्रेमाचा
रंग तुझ्या माझ्या प्रेमाचा
अलवार आला सख्या,
माझ्या याच जीवनात
सप्तपदी ओलांडून
रमले मी संसारात...१!
रंग चढला तुझ्या प्रेमाचा
आले जीवन बहरून
होता स्पर्श तुझा सख्या
गेले अंतरंगी मोहरून...२!
टपोरा चंद्रमा नभात
चंद्र,चांदण्या सम प्रीत
चांदण्या रातीला गाऊ
तुझे माझे प्रेमाचे गीत...३!
गंधाळली रातराणी अंगणी
सुवासिक गंध दरवळे मनी
रंग तुझ्या माझ्या प्रेमाचा
एकरूप झालो रे जीवनी...४