रंग प्रेमाचा - गुलाबी
रंग प्रेमाचा - गुलाबी
रंग गुलाबी आशेचा,
रंग गुलाबी नव्या सुरुवातीचा...
रंग गुलाबी स्नेहाचा,
रंग गुलाबी प्रेमाचा...
रंग गुलाबी जिव्हाळ्याचा,
रंग गुलाबी सौंदर्याचा...
रंग गुलाबी आपुलकीचा,
रंग गुलाबी तुझ्या माझ्यातील ऋणानुबंधाचा....
आज उगवली गुलाबी रंगाची प्रेमाची पहाट
गुलाबी रंगात अधिकच खुलतो तुझ्या सौंदर्याचा थाट....
अल्लड, अवखळ जराशी हट्टी
गुलाबी रंगाची उधळण करत अवतरली माझी परी,
तुझी माझी जेव्हा जमते गट्टी
हास्याची बरसात होते मुखकमलावरी....
अंतरंगातील गुलाबी रंग
दिसतो तुझ्या नयनात
आपुलकीचा भाव जाणवतो नेहमीच तुझ्या स्पर्शात....
रंगूनी गुलाबी रंगात
हरवून जावे तुझ्या प्रेमात
ऋणानुबंध मायेचे हे
जपून ठेवूया नेहमीच ह्रदयात....
बनेल आपले एक जग
फुलेल तिथे मैत्रीचे फुल
बहर येईल नात्यालाही
अनोख्या आपल्या बहिण प्रेमालाही...
सोबतीत तुझ्या आयुष्य गवसते
नवे काही करण्याची दिशा सापडते
मौनात तू असतेस तरी
डोळ्यातूनच तुझ्या गुलाबी रंगाची छटा पसरते...
तुझ्या संगतीत,तुझ्या सोबतीत
नेहमीच मला राहू देत
तुझ्या सहवासाने
जीवनी माझ्या गुलाबी रंगाची उधळण होऊ देत...
गुलाबी रंगाची उधळण होऊ देत...

