रंग बरसे
रंग बरसे
चाहूल ती श्रावणाची
मनाचा रंग ,प्रेमाचा रंग,
रंगपंचमी अवतरली //
तू राधा , मी शामरंग ,
विसरुनी भान,
रंगरानी माझी बहकली //
रंग स्वतःचा विसरुनी ,
नव नात्यांनी ,
रंगात तनु एकवटली //
घालुनी अंतर्मनाला साद ,
बेधुंद मनाचा बांध ,
सखी मनमुराद बागडली //
प्रेमाचा रंग , रंगात रंग ,
रंगात माझ्या रंगताना ,
काया तिची थरथरली //
उधळूनी रंग ,प्रेमाची भांग ,
मन हे उधाण,
नखशिखांत धरा शहारली //
भिजुनी चिंब न्हाली ,
लाजेने चूरचूर ,
वस्त्रे तनुस लिपटली //
नाना रंग ल्यालेली ,
रंगांचा नाद भारी ,
लतावेली जणू ती दरवळली //
रंगलो जणू असे की ,
क्षणात रेषा रंगांची ,
मी तिच्या सवे रेखाटली //
चाहूल ती श्रावणाची
मनाचा रंग ,प्रेमाचा रंग,
रंगपंचमी अवतरली.....

