STORYMIRROR

sarika k Aiwale

Romance Tragedy Inspirational

3  

sarika k Aiwale

Romance Tragedy Inspirational

रित्या ओंजळीत माझ्या

रित्या ओंजळीत माझ्या

1 min
262

रित्या ओंजळीत माझ्या सल अंतरीची बोचते 

उरले निरर्थक सारे माझे च ते अस्त्तित्व होते 


रिकाम्या नभात का आज मेघ काळे दाटले 

उरले निशब्द सारे या मनाला ते पहारे होते 


रित्या मनीच्या गाभाऱ्यात शंख नाद उमटले 

उरले ना हाती काही सारे जग थांबले होते 


राहिल्या काही उणीवांत मी मनाला शोधते 

उरले निःसंग सारे तुझ्यात ते पसारे होते 


रित्या ओंजळीत माझ्या स्वप्न या मनीचे बोलते 

उरले निमित्तात सारे वाट कोणाची पहात होते 


रीघ ओसरली आता भाव चित्रात बोलके झाले 

उरली नात्यापूर्ती आता विधिलिखित सांगत होते.. 


राहीले जे काही होत सगळच ते व्यर्थ नव्हतं 

उरल्या श्वासातील कल्पना अन् स्वप्नांचे इमले होते...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance