STORYMIRROR

Asmita Satkar

Tragedy

2  

Asmita Satkar

Tragedy

रावा

रावा

1 min
511

कुंपणावरचा रावा 

काल सांगत होता

तिची ख्यालीखुशाली.....


म्हटला ती दिसली अंगणात,

वाटली जरा सुखावलेली,

पण तिच्या दारात 

सगळीच फुलं मरगळलेली ...


विचारलं तिला ठीक आहेस का ?

म्हणाली मला ऐन पावसात

सुकलेली बाग पाहिलीस का ???


उत्तर मिळाले म्हणुन निघालो,

तर म्हणते कशी ....

खुशाली तेवढ कळवं त्याला,

फुलवं मी दिलेली सायली

अन् जमलच तर विसर मला !!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy