Asmita Satkar

Tragedy


2.3  

Asmita Satkar

Tragedy


आठवांची कस्तुरी

आठवांची कस्तुरी

1 min 338 1 min 338

तू जाताना दूर हृदयाच्या कुपीत आठवांची कस्तुरी ठेवून गेलास,

क्षणांच्या सहवासात माणूस म्हणून​ मला जगणं शिकवून गेलास


आयुष्य जगण्याच गणित शिकवून

तू मला परिपूर्ण बनवून गेलास

हरवले होते मी भूतकाळाच्या गर्तेत

तू तर मला वर्तमानातच रमण्याचं सुंदर तंत्र शिकवून गेलास


अंधाऱ्या उदासीन अवसेच्या रात्री तिचं उदास असणं नाही तर तिचं मोकळेपण घ्यायचं असत हे शिकवून गेलास...


तू भरभरून आयुष्य जगायचं शिकवलं खरं रे

पण तुझ्याशिवाय जगायचं शिकवायला मात्र विसरून गेलास


आयुष्याच्या अंबरात सुखाचे पसरून चांदणे 

तुझ्यावाचून राहण्याचं दुःख तेवढं देऊन गेलास


तुझ्या आठवांचा गंध जेव्हा आसमंतात दरवळतो

तेव्हा नयनांचा हा मृग त्या गंधाच्या शोधात चौफेर धावतो...

या नयनांना ठेवून असं शोधात...

तु कधीही न सापडण्यासाठी गेलास...

तू जाताना दूर हृदयाच्या कुपित आठवांची कस्तुरी ठेवून गेलास...


Rate this content
Log in

More marathi poem from Asmita Satkar

Similar marathi poem from Tragedy