Asmita Satkar

Others


2  

Asmita Satkar

Others


घर माझे

घर माझे

1 min 398 1 min 398

तुझ्या चार भिंती नुसत्या

अन् काचेचे छप्पर,

पडक्या घरास माझ्या

बघ नभाची झालर


वाड्यात तुझ्या

अत्तर शिंपलेले

अन् घर माझे

प्राजक्ताने दरवळलेले,


घर तुझे लख्ख

दिव्यांनी टिमटिमते

पण तुटक्या बाजेवर माझ्या

बघ चांदणे रोज पहुडते


तुझ्या सुखासही असते

दुखरी किनार

दुःख बघ माझे हसते

नियतीवर होऊन उदार


Rate this content
Log in