STORYMIRROR

Smita Murali

Classics

3  

Smita Murali

Classics

रानवाटा

रानवाटा

1 min
439

माझा बाप शेतकरी

रान फुलवी जोमान

कशी डोलते शिवारी

तरु लतेची कमान


स्वारी रानात निघता

संगतीला रानवाट

नाद झुळझुळ कानी

कसा भुलवितो पाट


माझी पाऊले सानूली

तुडविती रानवाटा

अनवानी या पायात

कधी रुतलाही काटा


कधी माखला चिखल

गमबुट शोभे पायी

रानवाटा धुंडाळत 

मला चालण्याची घाई


 गर्द हिरवी ती झाडी

जणू अवतरे स्वर्ग

रानी देखावा पाहण्या

 रानवाट असे मार्ग


याच रानवाटांवर

लुटलेला रानमेवा

माझ्या रानवाटांनो गं

माझी आठवण ठेवा!!!!



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics