STORYMIRROR

Vijay Sanap

Romance

4  

Vijay Sanap

Romance

रानवाट

रानवाट

1 min
325

अंधरली  रानवाट

गर्द झाडी जंगलात

हूर हूर लागे जीवा

दरी खोऱ्या डोंगरात ।।


वारा उनाड वाहतो

नाच करते  पालवी

सळसळ आवाजात

धरा मनाला भूलवी ।।


वृक्ष वेली बहरली

फुले परिसर सारा

रानवाट वळनाची

झाडा आडून वावरा ।।


नाला वाहे खळखळ

रान वाटच्या बाजूनं

गाडी वाट आवखळ

आली डोंगरा भेटूनं ।।


कुसळात गवताच्या

तुडवीत   रानवाट

नागमोडीनं चढलो

माळरानाचा तो घाट ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance